f
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे लोकप्रिय शैक्षणिक वेबसाईट (ब्लॉग )"शिक्षणमित्र" वर आपले सहर्ष स्वागत...!




","","",""/>

MS-Excel Tips

Excel TIPS :-


Lookup हे Function अशा ठिकाणी वापरतात ज्या ठिकाणी आपणास दोन किंवा तीन सेल मधील माहिती हि एका महितीच्या आधारे दर्शविली जाते.

जसे आपण विद्यार्थी रजिस्टर क्रमांक व विद्यार्थ्याचे नाव हे दोन वेगवेगळ्या सेल मध्ये असेल आणि आपण जर दोनच सेल मध्ये हा सर्व data एका माहितीच्या आधारे आपण पाहू शकतो.

माहितीची फाईल कशी बनवावी ?

  1. प्रथम एका सेल मध्ये रजिस्टर क्रमांक(A1) व दुसऱ्या (B1) सेल मध्ये विद्यार्थी नावे टाकावीत.
  2. यामध्ये कितीही नावे व रजिस्टर क्रमांक टाकले तरी चालतील.
  3. ज्या ठिकाणी आपणास नावे हवी आहेत त्या ठिकाणी आपण या LOOKUP  चा वापर करू शकतो.
  4. F1 सेल मध्ये रजिस्टर क्रमांक हे हेड व F2 सेल मध्ये नाव हे हेड टाकावे.
  5. आता G1 सेल मध्ये कोणताही एक रजिस्टर क्रमांक टाका व   G2 सेल मध्ये "=LOOKUP(G1,A3:B8)" हा फोर्मुला टाकावा.
  6. यामध्ये G1 हा ENTRY सेल म्हणून वापरला जाईल व  A3:B8 हा सर्व REFERANCE AREA असल्याने जो भाग आपणास LOOKUP मध्ये घ्यावयाचा आहे तो सर्व भाग येथे घेणे आवश्यक आहे. येथे वरील हेड घ्यावयाचा नाही ह्याची काळजी घ्यावी.
  7. आता G1 मधील रजिस्टर क्रमांक बदलल्यास आपणास त्या रजिस्टर क्रमांकास ज्याचे नाव आहे ते नाव दिसेल.
  8. अधिक माहितीसाठी खालील चित्र स्वरूपातील माहिती पहा.




Sunday, April 17, 2016


IF या फोर्मुल्याचा वापर कसा करावा?

आपण आज IF या फोर्मुल्याचा कसा वापर करावा याविषयी माहिती घेणार आहोत

IF हा फोर्मुला कोणकोणत्या ठिकाणी वापरतात?

ज्या ठिकाणी जर , तर हे शब्द प्रयोग वापरून काही कमांड दिल्या जातात त्या ठिकाणी IF या फोर्मुल्याचा वापर करतात. सर्व साधारण पणे निकाल पत्रक बनवताना या फोर्मुल्याचा वापर करताना दिसतो.

 जर ९० व त्यापेक्षा जास्त गुण असतील तर “अ” श्रेणी
हा फोर्मुला थोडक्यात विस्तारित
  
=IF(C4>90,”अ”) यामध्ये हा फोर्मुला वाचताना =(इज इक्वल टू) इफ C4(हा आपण निवडलेला सेल) हा ९० पेक्षा जास्त अंकाचा असेल तर “अ” हा शब्द Result मध्ये यावा.याच्या मध्ये (,) स्वल्पविराम ची अत्यंत आवश्यकता आहे कारण हा नसेल तर येथे ERROR येईल.
     
    यामध्ये ९० च्या पुढील संख्या गृहीत धरली जाईल. येथे IF या शब्दानंतर “(“ हा कंस खुला केला व त्यानंतर सर्व कमांड देवून “)” हा कंस बंद केला गेला. येथे कंस खुला व बंद केल्याशिवाय व स्वल्पविराम दिल्याशिवाय if चा फोर्मुला कार्य करीत नाही. म्हणून लक्षात ठेवा कि जितके कंस खुले केले तितके बंद करावेच लागतील.

, जर ८० व त्यापेक्षा जास्त गुण असतील तर “ब” श्रेणी,

हा फोर्मुला थोडक्यात विस्तारित

Tuesday, March 29, 2016


How to round in unit, ten and hundred using ceiling formulas in Excel tips and tricks.


आपणास जर एखादी संख्या पूर्णांकात घ्यावयाची असेल तर आपण त्यासाठी Round चा फोर्मुला वापरत होतो. पण जर आपणास एखादी संख्या पुढील पूर्णांकात नव्हे तर पुढील दशकात हवी असेल तर आपण त्यावेळेस ceiling चा फोर्मुला वापरू शकतो.
   उदा. मागील सहाव्या वेतन आयोगामध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार १०३२२ रु. असेल तर त्याला १०३३० करण्यासाठी =CEILING(10322,10) या फोर्मुल्याचा वापर केला जातो.

जर आपणास हीच संख्या पुढील शतकामध्ये घ्यावयाची असेल तर " =CEILING(10322,100) " या फोर्मुल्याचा वापर करतात. त्यामुळे आपणास त्यापुढील RESULT पुढील शतकात म्हणजेच "१०४००" हे उत्तर मिळेल.


Tuesday, March 22, 2016


Round या फोर्मुला कसा वापरावा? संख्या पूर्ण अंकी करण्यासाठी कोणता फोर्मुला वापरावा?


आपणास काही ठिकाणी दशांश संख्यांना पूर्ण अंकी संख्येत रुपांतर करण्यासाठी round या फोर्मुल्याचा वापर करतात.

ROUND चा वापर


  • जर F11 या सेल मध्ये 24.60 हि संख्या असेल तर 
  • G11 या सेल मध्ये त्याची पूर्ण संख्या साठी खालील फोर्मुला वापरावा.
  • G11 मध्ये क्लिक करावे.
  • =ROUND(F11*1,0) " या फोर्मुल्याचा वापर करावा.
  • यामध्ये संख्या जर 0.5 च्या पुढे असेल तर पुढील पूर्णांक व 0.5 च्या मागे असेल तर मागील पूर्ण संख्या येईल.




ROUNDUP व ROUNDDOWN चा वापर


  • जर कोणतीही संख्या पुढील पूर्णांकात घ्यायची असेल तर खालील ROUNDUP फोर्मुल्याचा वापर करावा.
  • त्यानंतर स्वल्पविराम देवून किती दशांश स्थळापर्यंत संख्या हवी तो अंक लिहावा.
  • =ROUNDUP(F11,0)  याठिकाणी 0 म्हणजे पूर्णांक संख्या होय.
  • किंवा 
  • =ROUNDUP(F11,2) याठिकाणी 2 म्हणजे दोन दशांश स्थळापर्यंत संख्या दर्शवते.


जर कोणतीही संख्या मागील पूर्णांकात घ्यावयाची असेल

  • तर ROUDNDOWN चा वापर करतात.
  • त्यानंतर स्वल्पविराम देवून किती दशांश स्थळापर्यंत संख्या हवी तो अंक लिहावा 
  • =ROUNDDOWN(F11,0) या ठिकाणी पूर्ण अंकी संख्या मागील दशांश अंकापर्यंत येते.



श्रेणीनिहाय विद्यार्थी संख्या कशी गणन करावी? एकाच सेल मधील एक अक्षर किती वेळा आले हे कसे शोधावे?


आपण विद्यार्थी श्रेणी काढत असतो. पण अ१ श्रेणी किती विद्यार्थ्याना मिळाली हे आपण काढण्यासाठी countif या फोर्मुल्याचा वापर करू शकतो.

countif हा फोर्मुला एका सेल मधील दिलेल्या अक्षराची संख्या किती हे काढण्यासाठी याचा वापर करतात.

  • ज्या सेल मध्ये गणन करावयाचे तो सेल निवडा.
  • त्या सेल मध्ये
  • = countif(येथे ज्या सेल मधील गुण निवडावयाचे तो सेल निवडा , "A1") " हा फोर्मुला टाका.
  • खालील चित्रामध्ये "=COUNTIF(D2:D7,"A1")" हा फोर्मुला टाकला आहे.
  • Enter बटण दाबा.
  • तुम्हाला A1 श्रेणीमध्ये किती विद्यार्थी आहेत ते अंक दिसतील.
  • याच प्रकारे पुढील फोर्मुल्यामध्ये श्रेणी बदलून फोर्मुले टाका.
  • तुमचा श्रेनिहाय निकाल तयार.



COUNT FORMULA एखाद्या स्तंभामध्ये किती अंक आहेत हे कसे ओळखावे ?


COUNT फोर्मुला द्वारे एखाद्या स्तंभामध्ये अंक आहेत हे कसे ओळखावे.

  • उभ्या स्तंभामध्ये किती सेल मध्ये अंक आहेत हे ओळखणे 
  • ज्या सेल मध्ये COUNT करावयाचे आहेत तो सेल निवडा.
  • त्यामध्ये खालील फोर्मुला टाकून सेल निवडा.
  • =COUNT(cellfrom : cellTo) " म्हणजेच " =COUNT(C2:C7) " 
  • ENTER बटन दाबा 
  • तुमच्या दिलेल्या स्तंभामध्ये किती स्तंभात अंक आहेत त्याचे नेमके अंक दर्शवेल.

Monday, March 21, 2016


Excel Tips : Calculate Age year from Date of Birth in Marathi excel tips.

आपणास जर एखाद्या व्यक्तीचे वय काढायचे असेल तर त्याच्या दिलेल्या जन्म दिनांकास फोर्मुला देवून दुसऱ्या सेल मध्ये त्याचे वयाचे फक्त वर्ष काढू शकतो.

A7 या सेल मध्ये जन्म दिनांक नोंदवा व B7 सेल मध्ये आजची दिनांक "TODAY( )" हा फोर्मुला टाकून सेट करा. कारण नंतर केंव्हाही या सेल मध्ये चेक केल्यानंतर त्या वेळेची तारीख आपणास दिसेल व त्यानुसार वय गणले जाईल.
  आता जेथे तुम्हाला वयाचे वर्ष हवे तेथे "  =DATEDIF(A7,B7,"Y") "  हा फोर्मुला टाका. व ENTER बटन दाबा , तुम्हाला त्या दोन तारखामधील वर्षाचा फरक मिळेल.



Calculate Day,Month and Year from Date separately in Excel Tips


जर आपणास एखाद्या दिनांकावरून जर त्या तारखेचा दिवस , महिना व वर्ष वेगवेगळे करू शकतो. त्यासाठी हे सर्व घटक वेगवेगळ्या सेल मध्ये निवडावे लागतील. व त्याला वेगवेगळे फोर्मुळे द्यावे लागतील.

जर A7 मध्ये दिनांक ( 12-DEC-12) असेल तर
B7 मध्ये त्या तारखेमधील दिवस
C7 मध्ये त्या तारखेमधील महिना
D7 मध्ये त्या तारखेमधील वर्ष
आपल्यास गणन करता येईल. त्यासाठी आपणास दिलेल्या सेल मध्ये खालील फोर्मुळे देता येतील,
B7 मध्ये " =DAY(A7)"
C7 मध्ये  " =MONTH(A7) "
D7 मध्ये  " =YEAR(A7) "
हे फोर्मुले दिल्यानंतर आपल्याला त्या त्या सेल मध्ये योग्य तो RESULT मिळेल.


Excel Tips : How to execute next date and previous date in Marathi Excel tips.


दिलेल्या दिनांकाच्या पुढील दिनांक कसा शोधावा.

जर A7 मध्ये दिनांक (1-APR-14) दिली असेल तर B7 मध्ये आपणास पुढील दिनांक घेण्यासाठी " =A7+1" हा फोर्मुला टाकल्यानंतर पुढील (2-MAR-14) हा  दिनांक मिळेल.
दिलेल्या दिनांकाच्या मागील दिनांक कसा आणावा.

जर A7 मध्ये दिनांक (1-APR-14) दिली असेल तर B7 मध्ये आपणास मागील दिनांक घेण्यासाठी " =A7 - 1" हा फोर्मुला टाकल्यानंतर मागील (31-MAR-14) हा दिनांक मिळेल.


Excel Formulas : Calculate Date and Time in excel worksheet.


    आपणास काही वेळेस लिखित स्वरूपातील फोर्मुले सुद्धा कसे वापरावेत हे समाजत नाहीत अशावेळेस तुम्हाला या images मदत करतील..

आजची दिनांक व वेळ कशी काढावी... NOW FORMULA

ज्या सेल मध्ये आपणास result हवा त्या सेल मध्ये खालील फोर्मुले टाका , अपोआप result मिळेल.
 = NOW( )    हा फोर्मुला टाकल्यानंतर आपणास आताची दिनांक व वेळ लगेचच दाखवेल हा दिनांक व वेळ ज्या वेळी तुम्ही हा निकाल पाहणार त्या वेळेचाच दाखवेल.
उदा. आज दिनांक टाकल्यानंतर आजचे दिनांक व वेळ दाखवेल व उद्या पाहिलेनंतर आपणास उद्याचा दिनांक व तेव्हाची वेळ दाखवेल.



TODAY

जर तुम्हाला आजचा दिनांक फक्त हवा असेल तर खालील फोर्मुला टाका.
=TODAY( ) तुम्हाला तुमची आताची तारीख मिळेल.

Sunday, March 20, 2016


Excel Formula : How to find Day from given date in Marathi.


दिलेल्या दिनांकापासून फक्त वार कसा शोधावा.
आपल्याला जर दिलेल्या दिनांकापासून त्याच्या दिवस शोधावयाचा आहे.

  • A2 सेल मध्ये १ एप्रिल २०१४  दिनांक असेल तर 
  • B2 सेल मध्ये  " =TEXT(WEEKDAY(A2),"dddd") हा फोर्मुला टाकावा , 
  • आपणास B2 सेल मध्ये "TUESDAY" हे उत्तर मिळेल.



अगदी त्याच प्रमाणे दिलेल्या दिनान्काचा जर महिना शोधावयाचा असेल तर 
  • जर A2 सेल मध्ये १ एप्रिल २०१४  दिनांक असेल तर 
  • B2 सेल मध्ये  " =MONTH(A2) " हा फोर्मुला टाकावा , 
  • आपणास B2 सेल मध्ये "" हे उत्तर मिळेल.
  • कारण एप्रिल महिना 4 क्रमांकावर येतो..



Friday, March 18, 2016


एखाद्या सेल मध्ये वजा संख्या असेल तर ती संख्या अधिक मध्ये कशी आणावी.

आपणास जर एखाद्या सेल मध्ये (-1) असेल तर ते आपण (+1) कसे करावे

प्रथम A2 सेल मध्ये -4 हि संख्या असेल तर तीच संख्या आपणास +4 करावयाची असेल तर

  • B2 सेल मध्ये क्लिक करा.
  • " =ABS(-4) " OR " =ABS(A2) " हा फोर्मुला टाका. 
  • तुम्हास " 4 " हा OUTPUT मिळेल.
  • तुम्ही हेच अंक बदलून सुद्धा पाहू शकता. 
  • किंवा A2 सेल चे लोकेशन दिले असेल तर त्यातील संख्या बदलल्यानंतर बरोबर निकाल मिळेल.
  • अधिक माहितीसाठी खालील चित्राचा वापर करा.


Wednesday, March 16, 2016


एक्सेल मध्ये Lower चे upper मध्ये व upper चे lower मध्ये रुपांतर कसे करावे?

काही वेळेस आपणास काही नावे small letters मध्ये टाईप केलेला डाटा मिळालेला असतो पण आपणास तो डाटा capital letters मध्ये दाखवावायाचा असतो त्यावेळी हा डाटा कसा बदलावयाचा ते खालील स्टेप्स प्रमाणे करावे.

Small letter चे  capital letters मध्ये रुपांतर करणे.
  • ज्या सेल मध्ये small letters आहेत तो सेल निवडावा लागतो. 
  • समजा A7 मध्ये hello हे small letters असतील तर ...
  • मग दुसऱ्या सेल मध्ये " =UPPER(A7) " हा फोर्मुला टाका व निकाल पहा.
किंवा  
  • "=UPPER("hello") " हा फोर्मुला टाका 
  • enter बटन दाबा.
  • तुम्हाला HELLO हा शब्द मिळेल.



Capital letter चे  small letters मध्ये रुपांतर करणे.
  • समजा A7 मध्ये  Capital letters असतील तर तो सेल निवडावा लागेल.
  • मग दुसऱ्या सेल मध्ये " =LOWER(A7) " हा फोर्मुला टाका 
  • Enter बटण दाबून निकाल पहा.
  • तुम्हाला hello हा निकाल मिळेल.
किंवा  
  • "=LOWER("HELLO") " हा फोर्मुला टाका 
  • Enter बटण दाबून निकाल पहा.
  • तुम्हाला hello हा शब्द मिळेल.

Sunday, March 13, 2016


Excel Formula : SUM ,Substract , Multiplication , Division

Microsoft Excel हे एक असे softwear आहे ज्याच्या साह्याने आपण आपले calculation सहज आणि सोपे करू शकतो. पण त्यासाठी त्याचे आवश्यक फोर्मुले येणे आवश्यक आहे. पण काही फोर्मुले कसे वापरावयाचे याचे ज्ञान काहीवेळा अपुरे असते. या ठिकाणी या ब्लॉग द्वारे सर्व आवश्यक फोर्मुले देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथे आपण सूचना देवू शकता.

SUM चा फोर्मुला 
हा फोर्मुला दोन किंवा अधिक सेल मधील संख्यांची बेरीज करण्यासाठी वापरला जातो.
जसे : जेथे RESULT हवा त्या सेल मध्ये क्लिक करा व तेथे = हे क्लिक करा व SUM हा शब्द TYPE करून ज्यांची बेरीज करावयाची आहे ते सर्व सेल निवडा.
किंवा
दुसरी पद्धत : RESULT च्या ठिकाणी "=" हे चिन्ह निवडा व जितक्या सेल ची बेरीज करावयाची त्या प्रत्येक सेल ला निवडा व + हे चिन्ह निवडून सेल निवडा पुन्हा + निवडून पुन्हा जितके सेल असतील तितके निवडा व प्रत्येक सेल च्या मध्ये + चिन्ह निवडा..
म्हणजेच
RESULT च्या सेल मध्ये "B3+C3+D3+E3" हे टाईप करा म्हणजे तुमच्या  "E5" मध्ये 100 उत्तर मिळेल.












______________________________________________________________________________
वजाबाकी चा फोर्मुला : 
या मध्ये दोन संख्यांची वजाबाकी आपण तिसऱ्या सेल मध्ये करू शकतो यां साठी आपणास पारंपारिक पद्धीतीने जसे वजाबाकी करतो तसेच येथे सुद्धा वजाबाकी करू शकतो.
जसे :  TOTAL च्या सेल मध्ये ज्या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे त्यांच्या सेल ची वजाबाकी करा.
TOTAL मध्ये = चिन्ह दाबा. त्यानंतर मोठी संख्या - लहान संख्या निवडा , तुमचा REUSLT तुम्हाला मिळेल.
















__________________________________________________________________________
गुनाकाराचा फोर्मुला :
दोन संख्यांचा गुनाकाराचा फोर्मुला कसा वापरावा हे येथे दाखवले आहे.
जसे : जेथे TOTAL हवी तेथे = चिन्ह दाबा, पहिली संख्या (B3) * दुसरी संख्या  (C3) टाका म्हणजेच " =B3*C3 हा फोर्मुला टाका. म्हणजे त्या सेल मध्ये तुमचा RESULT मिळेल.


________________________________________________________________________________
भागाकाराचा फोर्मुला :
यामध्ये दोन संख्यांचा भागाकार कसा करावा हे दाखविले जाते.
जसे  : TOTAL मध्ये = चिन्हाचा वापर करा, व मोठी संख्या / लहान संख्या म्हणजेच दिलेल्या सेल मध्ये  "=B3/C3" या फोर्मुल्याचा वापर करावा लागेल म्हणजे दिलेल्या संख्येचा RESULT येईल.